प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकी संदर्भात संचालक मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली नाही. बुधवार 11 रोजी सकाळी अकरा वाजता ही सुनावनी होणार आहे.
कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे गोकुळच्या निवडणुकीलाही स्थगिती मिळावी, असा विनंती अर्ज गोकुळच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केला होता. यावर मंगळवार दि. 2 रोजी सुनावणी होवून न्यायालयाने गोकुळची मागणी अमान्य केल्याने अर्ज मागे घेतला होता. मात्र शुक्रवारी पुन्हा नव्याने याचिका दाखल केल्याने काय होणार याकडे लक्ष वेधले आहे.