प्रतिनिधी / शिरोळ
कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज पद्माराजे विद्यालयांमध्ये सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व त्यांच्या पत्नी स्वरूपा पाटील-यड्रावकर भाजपाचे नेते विद्यमान संचालक अनिलराव यादव या प्रमुख नेत्यांसह अन्य मतदारांनी आपला मताचा हक्क बजावला. सकाळी दहा वाजता १३४ मतदारांपैकी २१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. एका मतदाराचा मृत्यू झाला आहे.
सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुथ उभा करण्यात आले होते. विरोधी आघाडीचे कार्यकर्ते नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगेचे संचालक बाबा पाटील, मार्केट कमिटीचे विजय देशमुख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील, रणजीत पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने तर विरोधी आघाडीचे माजी सरपंच बी. जी. माने, भाजपाचे नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख यांच्यासह अन्य दोन्ही आघाडीचे समर्थक उपस्थित होते.
शिरोळ तालुक्यात १३३ मतदारांपैकी ३५ महिला मतदार आहेत पद्माराजे विद्यालयाच्य दोन खोल्यांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.