प्रतिनिधी / इचलकरंजी
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज आमदार प्रकाश आवाडे व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी आवाडे पिता पुत्रांशी बराच वेळ चर्चा केली.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात मोठी खलबते सुरू आहेत. आमदार प्रकाश आवाडे हे काँग्रेसला रामराम ठोकून स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजय झाले आहेत. त्यांनी आपला जिल्ह्यातील राजकारणामध्ये वेगळा गट आणि त्याचा दबदबा कायम ठेवला आहे. गोकुळ दूध संघाच्या पार्श्वभूमीवरच महाडिक यांनी भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भेट औपचारिक होती. महाडिक हे आवाडे दादा यांची विचारपूस करण्यासाठी आले होते असे सांगितले.