प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी. या गोकुळ प्रशासनाने दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयाती सुनावणी सोमवार 19 रोजी होणार आहे. शुक्रवारी न्यायाधीस उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने गोकुळसह सोळा संस्थांना वगळून राज्याती सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 31 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यासह जिल्हÎातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून धोका टाळण्यासाठीच गोकुळ प्रशासनाने महिन्यापुर्वी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक स्थगितीची याचिका दाखल केली आहे. परंतु अद्याप या या याचिकेवर सुनावणी झाली नव्हती. शुक्रवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. परंतु न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी झालीच नाही.
सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाचा शिरकाव होवून सुमारे चाळीसहून अधिक जणांना लागण झाली आहे. त्यामुळे येथील कामकाज आता ऑनलाईनच सुरु आहे.