पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन, गोकुळमध्ये बसू बारसानिमित्त गाय वासरांचे पूजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
आमच्यावर वैयक्तिक कितीही आरोप करा त्याला प्रतिउत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. मात्र गोकुळवर आरोप करताना दहादा विचार करा, हा संघ जिल्हय़ाची समांतर अर्थव्यवस्था आहे. ही ओळख कायम राहली पाहीजे, ब्रँडला धक्का पोहचणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. गोकुळमध्ये सोमवारी वसुबारस दिनानामित्त गाय-वासराचे पूजन प्रसंगी ते बोलत होते.
स्वागत प्रास्तावीक चेअरमन विश्वास पाटील यांनी केले व डॉ. प्रकाश दळवी यांनी गाय वासराच्या विविध जातीची माहिती दिली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या काळजलाच आम्ही हात घातला आहे. मुंबई पुण्यातील बडे व्यवसायीकांनी 30 लाखांपर्यंत म्हैस दूध विक्रीची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने म्हैस खरेदीसाठी 500 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. येत्या वर्षभरात किमान 20 लाख लिटर संकलनाचा टफ्पा पूर्ण करी, यंदा मार्चचा हिशोब पूर्ण झाल्याने उत्पादकांना अधिका काही देता आले नाही. परंतु पुढील दिवाळी सोन्याचांदीची करु अशी ग्वाही दिली.
खासदार संजय मंडिलक यांनी मानोगत व्यक्त केले. संचालक अरूण डोंगळे, अभिजीत तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व संघाचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. पी. पाटील यांनी केले.