मोठय़ा गटात सागर नंद्याळकर, लहान गटात उमेश कसोटी विजेते
बेळगाव : श्री गोकुळ युवक मंडळ शहापूर-बेळगाव यांच्यावतीने मोटरसायकलसोबत म्हैस पळविण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली होती. यावेळी शर्यतीचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ माजी महापौर महेश नाईक, जि. पं. सदस्य रमेश गोरल, सुनील देशपांडे, सुरेश पोटे, श्रीकांत शहापूरकर, युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव खाडे, रोहित भांदुर्गे, द्वारकेश पेडणेकर, आबाजान गवळी, सचिन हौशीकर, दीपक पाष्टे, पिंटू मरवे, माधुरी स्वप्नील जाधव, अनुराधा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शर्यतीचा निकाल -लहान गट : प्रथम क्रमांक-उमेश कसोटी, मंगाई प्रसन्न वडगाव, सिद्धेश्वर प्रसन्न काकती, आसद पानवाले, प्रथमेश भातकांडे, केदार तवनोजी, अभिजीत पाटील, जगदीश काकती, किशोर भातकांडे, योगेश पिंगट, अनिकेत पाष्टे, विश्वनाथ तवनोजी.
मोठा गट –प्रथम क्रमांक सागर नंद्याळकर मंडोळी, काळभैरव प्रसन्न चव्हाट गल्ली, प्रज्ज्वल तवनोजी, तन्वीर मिरजकर, राकेश बाद्रे, दुर्वा कोकितकर, निधी रोहित भांदुर्गे, राहुल चव्हाण, अरुण गवळी, बाळय्यास्वामी प्रसन्न, प्रकाश नेवगेरी, विश्वनाथ तवनोजी,
या म्हशींनी अनुक्रमे क्रमांक पटकाविला. यावेळी सूत्रसंचालन शाहीर व्यंकटेश देवगेकर यांनी केले. यावेळी शहापूर विभागातील गवळी बांधव तसेच गोकुळ युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.