वार्ताहर / गोकुळ शिरगाव
शिरोली व गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक लाख किमतीच्या चार मोटर सायकलसह कागल तालुक्यातील दोघा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या एकूण ४ मोटरसायकल हस्तगत करण्यात गोकुळ शिरगाव पोलिसांना यश आले आहे.
गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कणेरीवाडी ब्रिज जवळ विनाकारण फिरणारे मोटर सायकल स्वरांना थांबवून लायसन व वाहनांची कागदपत्रे तसेच कामाचे कारण अशी चौकशी करीत असताना दोन इसम विना नंबर प्लेटचे स्पेल्डर मोटर सायकल वरून आलेने सदर इसमाना थांबवून त्याच्या ताब्यातील गाडी बद्दल चौकशी करीत असताना गाडीच्या पाठीमागे बसलेला इसम पळून जात असताना त्यास पोलीस अंमलदार यांनी पकडून चौकशी करीत असताना सदरची गाडी नागाव फाटा येथून चोरी केल्याचे सांगितले. याविषयी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गाडी चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
यावरून अधिक चौकशी केली असता कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ व शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ अश्या चार मोटरसायकली एक लाख रुपये किमतीच्या सागर सात्ताप्पा शिंदे (वय-३८) रा.माळी गल्ली कागल व गुरू किसन पोवार (वय-२८) रा. सांगावं रोड काझी दवाखाण्याजवळ कागल यास अटक केली आहे.याकामी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे,पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील,याच्या आदेशानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन आदेशास अनुसरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे, प्रणाली पवार,पोलीस हवालदार संतोष तेंलंग ,प्रदीप जाधव,युवराज कांबळे,राकेश माने,सुहास संकपाळ,निलेश कांबळे,पोलीस अंमलदार उदय कांबळे,शामराव पाटील,भरत कोरवी, यांनी ही कारवाई केली.
यापूर्वी गोकुळ शिरगाव पोलिसांनी गोकुळ शिरगाव , शिवाजीनगर ,राजारामपुरी,करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सुमारे २,७५०००/- किमतीच्या १० मोटर सायकल हस्तगत करून गोकुळ शिरगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. एकच महिन्यात ही दुसरी कारवाई केली आहे