घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल
प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव येथील मसोबा माळवाडी येते रहात असलेल्या मयुरी खशाबा पवार( वय 12) या मुलीला मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास तिच्या घरात अज्ञात व्यक्तीने येऊन तिला घेऊन गेला. आज बुधवार दिनांक 24 रोजी खुशाबा पवार (वय 36) मुळगाव आथणी जि. बेळगाव. सध्या राहणार गोकुळ शिरगाव मसोबा माळवाडी यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे.
गोकुळ शिरगाव पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत. अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि रविकांत कच्चे करीत आहेत.