वार्ताहर / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा येथे शिवसेना करवीर दक्षिण यांच्या वतीने आज चीनने भारतीय सैनिकांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेधार्थ चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
यावेळी गोकुळ शिरगाव फाटा येथील चौकात शिवसैनिकांनी चीन विरोधात मोठमोठ्या घोषणा दिल्या. शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विनोद खोत, उपतालुका प्रमुख भगवान कदम, वाहतूक सेना तालुका प्रमुख दयानंद शिंदे, सरदार तिप्पे, सुरेश पाटील, शांताराम पाटील, बबलू शेख, भारत खोत, सर्जेराव ढाले, जावेद शेख, सुकुमार शिंदे ,रविद्र जाधव , प्रदिप बागल ,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.