बेळगाव : उत्तर कर्नाटकातील वाणिज्य कॉलेजमध्ये अग्रेसर म्हणून ओळखले जाणारे केएलएस संचालित गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सला नॅक मूल्यांकन समितीने 29 व 30 ऑक्टोबरला भेट दिली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱया विविध अभ्यासपूरक उपक्रमांची नॅक मूल्यांकन समितीने पाहणी करून गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सला ‘ए’ मानांकन प्रदान केले.
नॅक मूल्यांकन समितीकडून कोलान विद्यापीठाचे कुलगुरु, गुरु जांबेश्वर विश्वविद्यालयाचे प्राध्यापक आणि न्यू आर्ट्स-कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा, महाराष्ट्राचे प्राचार्य यांनी भेट दिली. सतत दुसऱयांदा ‘ए’ मानांकन मिळविणारे हे उत्तर कर्नाटकातील पहिले महाविद्यालय आहे. प्राचार्य डॉ. एच. एच. वीरापूर यांचे नेतृत्त्व, आयक्यूएसी समन्वयकांचे मार्गदर्शन व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱयांच्या प्रयत्नांमुळे कॉलेजला यश मिळाले आहे. केएलएसचे कार्याध्यक्ष प्रदीप सावकार, नियामक मंडळाचे सचिव व्ही. एम. देशपांडे, विवेक कुलकर्णी, गोगटे कॉलेजचे कार्याध्यक्ष ए. के. तगारे यांच्या मार्गदर्शनामुळे हे साध्य झाले आहे.