वाहनाने ठोकरल्याने पथदीप वाकला : दुरुस्तीची वाहनचालकांमधून मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
गोगटे ओव्हरब्रिजवरील पथदीप धोकादायक स्थितीत आहे. तो एका बाजूने वाकल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. शनिवारी रात्री अज्ञात वाहनाने पथदीपला ठोकर दिल्यामुळे तो एका बाजूला कलंडला आहे. या पथदिपाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.
नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या गोगटे ओव्हरब्रिजवर अद्यापही अनेक समस्या आहेत. ब्रिज तयार होत असताना कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर मागील वषीच्या पावसाळय़ात रस्ता खचला होता. अनेक वेळा दुरुस्ती करूनही ब्रिजवरील रस्ता वारंवार खचत होता. यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.
ओव्हरब्रिजवरील पथदीप वारंवार बंद असल्याची तक्रार करण्यात येत होती. अनेक दिवस पथदीप बंद असल्याने अंधारातूनच मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली होती. आता त्यातील एक पथदीप एका बाजूला कलंडल्याने धोकादायक बनला आहे. एखादे मोठे वाहन आल्यास या पथदिपाला धडकण्याची शक्मयता आहे. येणाऱया जाणाऱया वाहनांवरही हा पथदीप पडू शकतो. त्यामुळे त्याची लवकर दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.