प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर गोडची (ता. रामदुर्ग) येथील विरभद्र देवस्थानात 3 जानेवारीपर्यंत देवदर्शन बंद असणार आहे. यंदा यात्राही साध्यापध्दतीने साजरी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी या संबंधी शनिवारी एक आदेश जारी केला आहे.
6 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. 18 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत होणारा यात्रो महोत्सवही यंदा साध्यापध्दतीने होणार आहे. सांकेतीकरित्या केवळ पूजा, अर्चा करुन मंदिरातच साध्यापध्दतीने सर्व विधी पार पाडण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. गोडची यात्रेसाठी दरवषी मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. फराळ, खेळण्यांची दुकाने, नाटक कंपन्या यात्रेसाठी येतात. यंदा मंदिरापासून 1 कि.मी. अंतरापर्यंत दुकाने थाटू नये, असा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.