मुंबई
एकाच दिवसात 575 कोटी रुपयांच्या फ्लॅट्स विक्रीचा विक्रम बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजने नुकताच नोंदवला आहे. सदरचे यश कंपनीने नोयडामधील ‘गोदरेज वुड्स’ प्रकल्पामध्ये प्राप्त केले आहे. दुसऱया टप्प्यातील प्रकल्पाच्या उभारणीपूर्वीच गोदरेजने 575 कोटींचे फ्लॅट्स विक्री करण्यात यश मिळविले आहे. याअंतर्गत कंपनीने 340 फ्लॅट्सची विक्री केली आहे. मुंबईच्या या कंपनीने 2010 मध्ये एनसीआर भागात प्रथम प्रवेश मिळवत प्रकल्पांची सुरुवात केली होती.