नवी दिल्ली : गोदरेज समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी 42 वर्षाच्या निसाबा गोदरेज यांची नियुक्त करण्यात आली आहे. विदेशातील हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले असून त्यांना स्टायलिश म्हणूनही ओळखले जाते. या अगोदर या पदावर विवेक गंभीर कार्यरत होते, त्यांच्या जागी निसाबा गोदरेज यांची नियुक्त करण्यात आली आहे. गंभीर यांनी ऑगस्ट 2009 मध्ये गोदरेज समूहासोबत काम केले होते. निसाबा या आदि गोदरेज यांच्या मुलगी आहेत. गोदरेज समूहाच्या सीएसआरच्या कार्यक्रमाची गुड आणि ग्रीनची जबाबदारी निसाबा यांच्याकडे होती. 2017 मध्ये जीसीपीएलच्या एक्झिक्मयुटीव्हच्या चेयरपर्सनपदी निवड केली होती.
Previous Articleमेक्सिको : 708 बळी
Next Article ‘इंडियन ऑईल’ने उत्पादन क्षमता वाढविली
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.