नवी दिल्ली
गोदरेज ऍण्ड बॉयसला वीज प्रकल्प व्यवसायासाठी देशो वीज पुरवठय़ाची 550 कोटी रुपयांपेक्षा अधिकची ऑर्डर मिळाली आहे. गोदरेज ऍण्ड बॉयस ही ऊर्जा पायाभूत सुविधा आणि नवीकरण ऊर्जाच्या क्षेत्रात निर्मितीतील मोठी कंपनी आहे. यामध्ये 400 किलोवॅटचे नवीन एआयएस उपकेंद्र, 220 किलोवॅट नवीन जीआयएस उपकेंद्र आणि 220 किलोवॅटच्या हस्तांतरण लाईनसह 220 किलोवॅटच्या जमिनीखालील केबल विस्तारण्याच्या कामाचा समावेश आहे.