नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लवकरच मुंबईमध्ये आपला नवा प्रकल्प साकारणार असून यामधून 1000 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीचा प्रकल्प आकुर्ली क्रॉस रोड, हनुमाननगर, कांदीवली पूर्व याठिकाणी साकारला जाणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ हा प्रकल्प 7 लाख चौरस फुटाच्या क्षेत्रफळावर साकारला जाणार आहे.