मुंबई
बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱया गोदरेज प्रॉपर्टीजला मार्चला संपलेल्या तिमाहीत 63 टक्के इतका तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नातही जवळपास 60 टक्के इतकी वर्षाच्या स्तरावर पाहता घट झाली असून ते 508 कोटी रुपयांवर राहिले आहे. निव्वळ तोटा 191.62 कोटी रुपयांवर राहिला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीला 102 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. वर्षाच्या स्तरावर बुकिंगच्या नोंदणीत मात्र 10 टक्के इतकी वाढ झाली आहे. मुंबईत कंपनीचे अनेक बांधकाम प्रकल्प कार्यरत आहेत.