सांगली/प्रतिनिधी
अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पणासाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक व शेकडो कार्यकर्ते स्मारकाच्या दिशेने रवाना झाले असून पडळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत लोकार्पण करणार असल्याचा इशारा दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असला तरी बंदोबस्ताला न जुमानता कार्यकर्ते स्मारकाच्या दिशेने रवाना होत आहेत.
सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. 8 मधील रघुवंशी कॉलनी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे. स्मारकाचा लोर्कापण सोहळ्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आहे. २ एप्रिलरोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे पण भाजपने याला विरोध केला आहे.