प्रतिनिधी / सांगली
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी करण्यात आली. आ. गाडगीळ यांनी मुंडेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, गटनेते युवराज बावडेकर, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, गणपती साळुंखे, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.