प्रतिनिधी /पणजी
समाजजीवनात असलेल्या अनेकविध संकल्पनांचा समुच्चय म्हणजे संस्कृती आहे. गोमंतकातील लोकसंस्कृती ही विविध संकल्पनांनी वैशिष्टपूर्ण आहे. ’फुगडी“ हा प्रकार निरनिराळय़ा तऱहेने खेळतात. गणेशचतुर्थी उत्सवात खास फुगडी खेळली जाते. गोव्यात खेळल्या जाणाऱया फुगडीच्या सत्तावीस प्रकारांची नोंद आहे, आज या स्पर्धेमुळे बरेच पारंपारिक प्रकार पाहायला मिळाले. फुगडी या प्रकाराला खास वेषभूषा नसते. नेहमीच्या पोषाखात फुगडी होते. त्यामुळे वेगळेपणा दिसतो. आज स्त्रीयांनी हि परंपरा टिकवून ठेवली आहे. असे उद्गार लेखिका ज्योती कुंकळकर यांनी नवी दिशा ट्रस्ट यांने मेगा फुगडी ईवेन्ट आयोजित केला होता. त्यावेळी समारोपाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर नवी दिशा ट्रस्टी श्री. राजेश फळदेसाई, शमीना सिद्धीकी, साई वळवईकर, ज्युलीयट मिनेझीस, आश्व्ा्रिनी शिरोडकर, अरूण भोसले, योगेश शेटय़? आणि संजय सावंत उपस्थित होते.
फुगडीच्या पहिल्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या गोमंत भारती महिला मंडळ यांनी एक लाखाचा पुरस्कार आणि ट्रॉफी मिळवली तर दुसऱया क्रमांकाचे बक्षिस पांडुरंग ब्रम्हेश्व्ा्रर मंडळ, आखाडा यांना साठ हजाराचे दुसरे बक्षीस तर तिसरा क्रमांक ॐ साई कलामंडळ यांनी चाळीस हजाराचं बक्षीस मिळालं. तर उत्तेजनार्थ पहिले बक्षीस गजानंद प्रसन्न या संस्थेला 20 हजाराचे बक्षिस मिळाले तर दुसरे उत्तेजनार्थ रामेय सती युवती फुगडी मंडळ यांना पंधरा हजाराचे बक्षीस मिळाले, तर तिसरे उत्तेजनार्थ बक्षीस श्री गजानंद महिला मंडळ या संस्थेने पटकावले. या फुगडी स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्वरा प्रियोळकर, सचिन गावस, आणि उत्कर्षा च्यारी यांनी काम पाहीले. यावेळी श्री राजेश फळदेसाई यानी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत केले. सगळय़ा मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन संजय साळेकर यांनी केले. हि फुगडी फक्त कुंभारजुवा या मतदारसंघापुरतीच मर्यादित होती. या स्पर्धेत एकूण 16 संस्था?नी भाग घेतला. हा कार्यक्रम खोर्ली इथे स्वरर्णम सभागृहात मोठय़ा उपस्थितीत रविवारी 1/11/21 रोजी पार पडला.