मंत्री गोविंद गावडे यांचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
आठ महिन्यात कला व संस्कृती खात्याला जास्त काम नसल्याने कोरोनाची जागृती होण्यासाठी लघुपट तयार करण्यात आला. कला व संस्कृतीचे कलाकार व तांत्रिक कर्मचारी आहेत. कमी खर्चात लघुपट तयार करण्यात आला आहे. कठीण परिस्थिती व नकारात्मक वातावरणात लघुपट तयार करणे अवघड आहे. परंतु या गोष्टींना न जुमानता लघुपट तयार केला. गोमंतकीयांनी लेट्स राईज अगेन हा लघुपट पहावा. चित्रपटनिर्मितीकडे युवावर्गाने वळावे. उत्तम पटकथा, कथा समोर आणाव्यात. उत्तम कथा गोमंतकीय कलाकारांकडे असेल तर कला व संस्कृती खाते सहकार्य करेल असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी कला व संस्कृती खात्याच्या सभागृहात लेट्स राईज अगेन या लघुपटाच्या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब, दिग्दर्शक व रंगकर्मी जयेंद्रनाथ हळदणकर, संतोष शेटकर उपस्थित होते. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते ‘लेट्स राईज अगेन’ या शॉर्ट फिल्मच्या पोस्टर व सीडीचे प्रकाशन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची एक ऊर्जा लेट्ज राईज अगेन या शॉर्टफिल्ममधून मिळते. संचालकांनी सदर प्रकल्प दिला. संपूर्ण खात्याने सहकार्य केले. या फिल्मचे पटकथा, गीते, संकलन, कॅमेरा, संतोष शेटकर यांचे आहे. शूटिंग कोरोनाचा सुरूवातीचा काळात करण्यात आला आहे. फिल्म करण्यासाठी आयडी हॉस्पिटलमध्ये गेलो. काही लोक तर लपून छपून शूटिंग पाहत होते असे रंगकर्मी व दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर यांनी सांगितले.
कोविड महामारीतील काही अनुभव या शॉर्ट फिल्ममध्ये दाखविण्यात आले आहेत. सदर फिल्म कला संस्कृती खात्यातर्फे करण्यात आले आहे. खात्यातील विविध पदाधिकारी, संगीतकारांनी, कलाकारांनी एकत्र येऊन सदर फिल्म तयार केली आहे असे कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले तर आभार कला व संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब यांनी मानले. सदर कार्यक्रमाला