प्रतिनिधी /म्हापसा
गोमंतक मराठा समाज संस्थेतर्फे समाजाला भूषणावह ठरलेल्या ज्येष्ठ आणि कर्तृत्ववान व्यक्तीला यंदापासून कै. भाऊसाहेब बांदोडकर स्मृती समाज भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
यंदाच्या पहिल्या पुरस्कारासाठी सामाजिक, सहकार क्षेत्रात योगदान दिलेले डॉ. रामकृष्ण मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्त उद्योजक आणि साहित्यिक डॉ. गुरुदास नाटेकर आणि प्रा. रवींद्र फोगेरी यांनी त्यांची सदीच्छा भेट घेऊन त्यांचे अभनिंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस सुयश चिंतिले.