प्रतिनिधी / म्हापसा
गोमंतक युवा भंडारी समितीच्या उत्तर गोवा बार्देश तालुका समितीतर्फे वनमहोत्सव कार्यक्रम पार पडला.
म्हापसा बोडगेश्वर मंदीराजवळील समाजाच्या प्रगती संकुल प्रकल्पाच्या परिसरात मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार जयेश साळगावकर, माजी आमदार किरण कांदोळकर, केंद्रिय अध्यक्ष अशोक नाईक, युवा अध्यक्ष सुप्राज नाईक तारी आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपण करून रोपटय़ांचे वाटपही करण्यात आले. पर्यावरण राखण्यासाठी आम्ही सर्वांनी वृक्षारोपण करावे असे आनवाहन यावेळी आमदार जयेश साळगावकर, अशोक नाईक, सुप्राज नाईक यांनी सांगितले.