कोरेगाव / वार्ताहर :
वाठार स्टेशन येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी आज पहाटे गोमांसाची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप पकडून वाठार पोलिसांच्या ताब्यात दिली. पिकअप चालकासह त्याच्या साथीदारावर वाठार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण पोलिसांना चकवा देत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या मांसाची राजरोजपणे वाहतूक करत असलेल्या पिकअपला शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वाठार स्टेशन चौकात पकडून चालक महादेव शिवाजी कुंभार आणि त्याचा साथीदार अक्षय बाळासो कुंभार यांना वाठार पोलिसांच्या ताब्यात दिले. या पिकअपमध्ये दोन हजार पाचशे किलो गाईंचे व बैलांचे मांस नेले जात होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे वाठार स्टेशन येथील कार्यकर्ते शिवम शामराव चव्हाण रा. वाठार स्टेशन ता. कोरेगाव यांनी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास वाठार पोलीस करीत आहेत.