प्रतिनिधी / पणजी
गोवा दंत महाविद्यालयाच्या स्थापनेपासून इमारत उभारण्यापर्यंत लक्ष घालून प्रत्यक्ष प्रकल्प साकार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे माजी डिन डॉ. खिवराज पांडुरंग कामत यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी राहत्या घरी निधन झाले.
डॉ. खिवराज हे गोव्यातील पहिले दंत सर्जन होते. राज्यात दंत महाविद्यालय स्थापन करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी तत्कालीन आरोग्य मंत्री हाजी शेख हसन हरुण यांच्या सहकार्याने केली. 1980 मध्येच गोवा दंत महाविद्यालयाची स्थापना झाली. डॉ. खिवराज यांच्या पश्चात त्यांची पत्नी गोमेकॉच्या माजी मेडिकल विभाग प्रमुख डॉ. लता कामत, तसेच चिरंजीव पांडुरंग कामत असा परिवार आहे. मळा पणजी येथील प्रसिद्ध प्रसुतीशास्त्रज्ञ डॉ. गोविंद कामत यांचे ते चुलते होत. तर छाया पत्रकार अंबाजी कामत यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.