प्रतिनिधी /बेळगाव
जुन्या सुवर्णकालीन हिंदी चित्रपटगीतांची नव्या पिढीला गोडी लागावी त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून त्या गीतांना सादर करावे, याकरिता गेली सहा वर्षे रसिक रंजनतर्फे ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ ही कॉलेज स्तरावरील स्पर्धा आयोजित केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या संकटामुळे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यंदाच्या वषी रसिक रंजन या संस्थेने ‘शो मस्ट गो ऑन’ हे ब्रीद पाळत गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम या स्पर्धेचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. सुमारे ऐंशी हजार रुपयांची रोख बक्षिसे या स्पर्धेच्या विजेत्यांना दिली जाणार आहेत.
त्यामध्ये प्रथम विजेत्या संघास पंचवीस हजार रुपये, द्वितीय संघास वीस हजार रु., तृतीय क्रमांकास पंधरा हजार रु., उत्तेजनार्थ दहा हजार रुपयांचे एक पारितोषिक असून उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट गायिकेसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. त्या शिवाय आकर्षक प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे प्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी हे आहेत.
सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी केवळ कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मुभा असून केवळ बेळगाव शहरातील पदवीपूर्व कॉलेज (pre-university) डिप्लोमा (अधिकृत डिप्लोमा) आणि पदवी कॉलेजमधील विद्यार्थी भाग घेऊ शकतात. यासाठी तीन सदस्यांचा चमू (संघ) कलाकारांनी बनवायचा असून, कोणत्याही कॉलेजचा विद्यार्थी कोणत्याही अन्य कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह संघ बनवू शकतो. संघामध्ये किमान एक मुलगी (female voice) अथवा एक मुलगा (male voice) असणे अनिवार्य असेल. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2021 ही असून प्राथमिक निवड फेरीसाठी स्पर्धा 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट रोजी संपन्न होईल, त्याचा तपशील माध्यमावर उपलब्ध असेल.
सदर स्पर्धेसाठी तीन कलाकरांचा चमू निवड फेरीत चार गाणी सादर करतील. प्रत्येक कलाकारांचे एक एक्कल (solo) गाणे आणि एक युगल अथवा तिघांचे गीत (duet or trio) सादर करावे लागेल. किमान पंधरा संघांनी भाग घेतल्यास स्पर्धा संपन्न होतील. स्पर्धेसाठी 300 रुपये प्रवेश फी प्रति संघ आकारण्यात येईल. एका विद्यार्थ्यास केवळ एकाच संघातून भाग घेता येईल, पहिल्या फेरीतून बारा संघ निवडले जातील, त्यामधून पुढे उपउपांत्यपूर्व (pre-quarter) उपांत्यपूर्व उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने होतील. या स्पर्धांचे थेट प्रसारण युटय़ूब चॅनल व अन्य माध्यमांमधून केले जाईल. अंतिम फेरीची स्पर्धा भव्य प्रमाणात केली जाईल.
या सर्व फेऱयांचा तपशील वेळोवेळी जाहीर केला जाईल, अधिक माहितीसाठी लोकमान्य रंगमंदिर (रिझ) थिएटर येथे संपर्क साधावा, अथवा परशराम माळी (9886694672) किंवा डी. जी. कुलकर्णी (9901502291) प्रा. अनिल चौधरी (9900081746) यांच्याशी संपर्क साधावा, अथवा रसिक रंजनच्या rasikranjan belgaum@gmail.com., (instagram Rasik-ranjan-belgaum, facebook page rasik ranjan या इमेल आयडीवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.