लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप.सोसायटी पुरस्कर्ते
प्रतिनिधी /बेळगाव
जुन्या सुवर्णकालीन हिंदी चित्रपटगीतांची नव्या पिढीला गोडी लागावी, त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून त्या गीतांना सादर करावे याकरिता गेली सहा वर्षे रसिकरंजन ही संस्था कॉलेज स्तरावरील गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम ही स्पर्धा आयोजित करीत असते. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यंदाच्या वर्षी लोकमान्य सोसायटी व रसिकरंजन यांनी या स्पर्धा आयोजित करण्याचे निश्चित केले असून, सदर स्पर्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करून घेतली जाणार आहे. विजेत्यांना सुमारे 80 हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
यामध्ये प्रथम विजेत्या संघास 25 हजार, द्वितीय 20 हजार, तृतीय 15 हजार, उत्तेजनार्थ 10 हजार असे पारितोषिक असून उत्कृष्ट गायक व गायिकेसाठी प्रत्येकी 5 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय आकर्षक प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेची दि. 24 व 25 ऑगस्ट रोजी प्राथमिक फेरी होईल. सकाळी 10 वा. लोकमान्य भवन (रिझ थिएटर) येथे या स्पर्धा होतील. केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे ऑर्थेपेडिक विभागाचे प्रमुख व ख्यातनाम ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजेंद्र भांडणकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन होईल. लोकमान्य सोसायटीचे संचालक, रसिकरंजनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील. ही स्पर्धा 14 संघांमध्ये रंगणार असून, येथील 12 संघांची उपउपांत्य फेरीत निवड केली जाणार असल्याचे आयोजकांनी सूचित केले आहे.