नवी दिल्ली
गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीसाठी वाढता कल दिसतो आहे. यावषी फेबुवारी महिन्यामध्ये गुंतवणूकदारानी गोल्ड एक्सचेंज टेडेड फंडमध्ये निव्वळ स्वरूपामध्ये 491 कोटी रुपये गुंतवले असल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे कमी झालेले दर तसेच विदेशी विनिमय बाजारामध्ये रुपयात आलेली घट व सीमा शुल्कामध्ये केलेली कपात याचा फायदा घेऊन गुंतवणूकदारांनी ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये ईटीएफमध्ये निव्वळ स्वरूपामध्ये 625 कोटी रुपये तर डिसेंबरमध्ये 431 कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत. तसेच गेल्या नोव्हेंबरमध्ये 141 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. येणाऱया काळातही ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढताच राहिल असा तज्ञांचा अंदाज आहे.