प्रतिनिधी/ सातारा
गोळीबार मैदान, विलासपूर, परीसरातील नागरिकांना चांगला रस्ता, पाणी अन्य सुविधा मिळण्यासाठी स्थानिक नागरिक व युवक सहकारी माझ्याकडे सतत पाठपुरावा करीत असतात. त्या काही प्रमाणात पूर्ण केल्या आहेत. राहिलेल्या कामासाठी जास्तीचे प्रयन्त करणार असल्याचे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
गोळीबार मैदान चौक या ठिकाणी केले सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रपरिवार यांच्या वतीने श्री. शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय लायन्स क्लब एमआयडीसी तसेच गोडोली आरोग्य केंद्र व जीविका हेल्थकेअर यांच्या माध्यमातून गोळबार मैदान चौक येथे मोफत नेत्रतपासणी मोतीबिंदू निदान व कोविड19 लसीकरण शिबिराचे उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ शरद पाटील, डॉ. अक्षय ताकवले, डॉ. मेघा अनुगडे, डॉ. विक्रम पिसाळ व त्यांच्या सहकाऱयांनी परीसरातील 230 नागरिकांची नेत्र तपासणी व 155 लोकांचे कोविड 19 लसीकरण या विशेष शिबिरांमध्ये करण्यात आले या शिबिरासाठी यावेळी नगरसेवक शेखर मोरे पाटील, सहकार बोर्डाचे धनंजय शेडगे, प. स. सदस्य आशुतोष चव्हाण, माजी सदस्य दादा जाधव, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब महामुलकर, युवराज जाधव, निलेश निकम, कुलदीप मोहिते व सहकारी यांनी शिबिरासाठी मोलाचे परिश्रम घेतले. या वेळी पोपटराव मोरे, राजू मोरे, वैभव भोईटे ,विजय काळोखे, मंगेश काशीद, गणेश निकम, श्रीकांत तोडकर, रामचंद्र देशमुख, प्रविण सावंत, सचिन कोळी, प्रशांत म्हमाणे, महेश शिंदे, उषा जाधव, सुवर्णा कणसे, किरण बाबर, योगेश जाधव, दीपक थोरात, रामभाऊ सुतार, अमोल सुतार, पंजाबराव पाटील, नंदकुमार देशमाने, नितीन सूर्यवंशी, अमोल नलवडे, किरण बाबर, राजाराम गायकवाड आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.