मुरमुणे सत्तरी दोन वर्षात प्रकल्प पूर्ण होणार
वाळपई / प्रतिनिधी
गोव्यासाठी प्रतिष्ठित मानला जाणाऱया गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील मुरमुणे या ठिकाणी उभारण्यात येणाऱया आयआयटी प्रकल्पासाठी सरकारने अखेर कागदपत्रे सोपस्कराना मान्यता दिली आहे. यामुळे सरकारच्यावतीने आवश्यक स्वरूपाची जमीन आयआयटी प्रकल्पाला हस्तांतरित करण्यात आल्यामुळे आता सदर प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीकोणातून मार्ग मोकळा झाला आहे.
यासंदर्भात एक खास सोहळा पणजीत आयोजित करण्यात आला होता. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते जमीन हस्तांतरित कागदपत्रे आयआयटी प्रकल्पाचे संचालक बि के मिश्रा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी मतदारसंघाचे आमदार तथा गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे,शिक्षण सचिव निला मोहनन,तंत्रशिक्षण संचालक विवेक कामत, गुळेली पंचायतीच्या सरपंच अपूर्वा चारी उपसरपंच नितेश गावडे व इतरांची खास उपस्थिती होती.
आयायटी प्रकल्प आपले स्वप्न—विश्वजीत
यासंदर्भाची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयाच्या गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रात मुरमुणे याठिकाणी सुमारे दहा लाख जमीन संपादित करून राष्ट्रीय स्तरावरील आयआयटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे .यासंदर्भातील घोषणा सरकारने जवळपास दीड वर्षापूर्वी केली होती. या संदर्भातील कागदपत्रे सोपस्कार पूर्ण करण्यास गेल्या काही दिवसापासून सुरुवात करण्यात आली होती .सरकारने याप्रकल्प उभारणी संदर्भात विशेष लक्ष दिले असून सुमारे दहा लाख चौरस मीटर जमीन सरकारने आज आयआयटी प्रकल्पाच्या स्वाधीन केली. यामुळे सत्तरी तालुक्मयाच्या विकासाला चालना देण्याबरोबरच राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानांकन प्राप्त होणारा हा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचा इरादा आयआयटी प्रकल्पाचे संचालक बी के मिश्रा यांनी आश्वासन दिले आहे. या प्रकल्पामुळे गुळेली ग्रामपंचायत क्षेत्राच्या विकासाला विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. सुमारे 5000 जणाचा मोठा कॅम्पस याठिकाणी उभारण्यात येणार असून यामुळे सर्वांगीण विकासाला खऱया अर्थाने चालना मिळणार असल्याचे पंचायतीच्या सरपंच अपूर्वा चारी यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात एक महत्वाची बैठक आज पणजीत संपन्न झाली. यामध्ये गोवा सरकारने दहा लाख चौरस मीटर जमीन आयआयटी प्रकल्पासाठी सदर व्यवस्थापनाकडे सुपुर्द केली आहे.
यासंदर्भात स्थानिक आमदार तथा गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया जलदगतीने पुढे नेण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. हा प्रकल्प सत्तरी तालुक्मयाच्या विकासाला खऱयार्थाने चालना देणारा असून सत्तरी तालुक्मयाची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर निर्माण होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळय़ा क्षेत्रात उद्योगधंद्यांना प्राधान्य प्राप्त होणार असून शैक्षणिक हब निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. या ठिकाणी आयटी प्रकल्प उभारण्यात यावा या संदर्भात ते आपले स्वप्न होते ते आता सत्यात उतरण्याची प्रक्रिया सुरू झाल्या बद्दल आपण समाधानी आहोत. सत्तरी तालुका हा आज मागासलेला राहिलेला नाही .सत्तरी तालुक्मयात आज जागतिक स्तरावर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. येणाऱया काळात वेगवेगळय़ा प्रकल्पाच्या माध्यमातून सत्तरी तालुका हा जागतिक नकाशावर येण्याच्या दृष्टीकोनातून आपले प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.
पणजीत आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमात गोवा सरकारने सुमारे दहा लाख चौरस मीटर जमीन आयटी प्रकल्प उभारण्यासाठी हस्तांतरित केली आहे. यासंदर्भाचे कागदपत्र आयआयटी संचालक बी के मिश्रा यांना सुपूर्द करताना गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे शिक्षण सचिव नीला मोहनन तंत्रशिक्षण संचालक विवेक कामत गुळेली सरपंच अपूर्वा चारी व इतर.