माफी न मांगितल्यास पोलीस तक्रारीचा इशारा
प्रतिनिधी / मडगाव
गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरून आयुर्वेदीक डॉक्टरांच्या संदर्भात केलेले वक्तव्य या महामारीच्या स्थितीत अत्यंत नीच आहे व आयुर्वेदिक डॉक्टर अथक परिश्रम घेत आहेत. त्यांची क्षमा मागण्याची व त्यांनी केलेले वक्तव्य मागे घेण्याची मागणी गोवा आयुर्वेदीक डॉक्टर संघटणेने केली आहे. जर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधातएफआयआर दाखल केला जाणार असल्याची माहिती आयुर्वेदीक डॉक्टर संघटणेने दिली आहे.
गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. दुर्गादास कामत यांनी केलेल्या निवेदनाचा निषेध करत असे म्हटले की, आयुर्वेदिक डॉक्टर माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात बी. ए. मुंबई विद्यापीठातून एम .एस. पदवी तसेच मेडिकल प्रॅक्टिशनर गोवा बोर्ड ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन ऍण्ड होमिओपॅथी (जीबीआयएसएम) मध्ये नोंदणीकृत आहे.
आयुर्वेद ही एक भारतीय औषधी प्रणाली आहे जी आयुष मंत्रालयाचा एक भाग आहे आणि जगभरात ती मान्य व सन्माननीय आहे, त्याला ढोंगी वैद्य म्हणणे देशविरोधी विधान आहे. या साथीच्या काळात सर्व आयुर्वेदिक डॉक्टर अथक परिश्रम घेऊन संपूर्ण गोव्यातील वेगवेगळय़ा रूग्णालयात अग्रस्थानी आरोग्य कर्मचारी म्हणून काम करत आहेत, तसेच आयएमएच्या सहकार्याने खासगी आयुर्वेदिक डॉक्टर गोव्यातील वेगवेगळय़ा भागातील घरगुती रोगींवर नजर ठेवून आहेत.
दुर्गादास कामत यांचे वक्तव्य या महामारीच्या स्थितीत अत्यंत नीच आहे. त्यांनी आपले विधान मागे घेतानाच आयुर्वेदीक डॉक्टरांची क्षमा मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंद करण्याचा इशारा दिलेला आहे. या पत्रकार परिषदेला गोवा काऊन्सिल ऑफ आयुर्वेदीकच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा भागवत, डॉ. जॉय परेरा व डॉ. दिपाली शिरवईकर यांची उपस्थिती होती.