दरड कोसळण्याचा प्रकार घडत असल्यामुळे नैऋत्य रेल्वेचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
दूधसागर नजिक दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे हजरत निजामुद्दीन ते मडगाव या मार्गावर धावणारी गोवा एक्स्प्रेस 9 ते 23 ऑगस्ट दरम्यान लोंढय़ापर्यंतच धावणार आहे. यामुळे पुढील काही दिवस तरी लोंढा- हजरत निजामुद्दीन अशी रेल्वे धावणार असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेने दिली आहे.
मुसळधार पावसामुळे चार दिवसांपूर्वी दूधसागर नजिक गोवा एक्स्प्रेसच्या रेल्वे इंजिनवर दरड कोसळली होती. या घाट मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी नैऋत्य रेल्वेकडून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. बऱयाच ठिकाणी मशीन पोहोचणेही अशक्मय असल्यामुळे मजुरांची मदत घेऊन हे काम सुरू आहे.
वास्को शहर व परिसरात कोरोनांच्या रूग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होत गेल्याने ही रेल्वे मडगाव ते हजरत निजामुद्दीन मार्गावर धावत होती. परंतु आता दरड कोसळल्यामुळे रेल्वे क्र. 02779 ही रेल्वे हुबळी-लोंढा- हजरत निजामुद्दीन अशी धावणार आहे. यामुळे गोव्याला जाणाऱया प्रवाशांना या सर्वाचा फटका बसणार आहे.
गणेश भक्तांचे होणार हाल
कोकण रेल्वे मार्गावर गोव्या नजिकच्या मालपे जवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुक बंद आहे. यामुळे गोव्याच्या प्रवाशांना पुणे – मिरज – बेळगाव – लोंढा या मार्गावरून जाणारी गोवा एक्स्प्रेस उपयुक्त ठरत होती. परंतु आता ही रेल्वे देखील लोंढय़ापर्यंतच धावणार असल्याने गणेश भक्तांना मिरज किंवा बेळगावला येवून येथुन बसने गोवा गाठावा लागणार आहे. त्यामुळे यावषी गणेश भक्तांना तारेवरची कसरत करतच प्रवास करावा लागणार आहे.
अरविंद मलकारे (विभागिय रेल्वे व्यवस्थापक- हुबळी)
पावसामुळे दरड कोसळत असून त्यामुळे मडगाव ते हजरत निजामुद्दीन धावणारी गोवा एक्स्प्रेस 9 ते 23 ऑगस्ट दरम्यान ही रेल्वे हुबळी – लोंढा- हजरत निजामुद्दीन अशी धावणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी मडगाव ते लोंढा या दरम्यानची रेल्वे वाहतुक थांबविण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे.