ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.
गोव्यात १४ फेब्रुवारीला ४० विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडलं होतं. मागच्या वेळी सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसला यंदा विजयाच्या आशा आहेत.
तर भाजपला यावेळी सत्ता राखण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवालांच्या ‘आप’शी टक्कर द्यावी लागणार आहे. ४० जागांसाठी होणाऱ्या स्पर्धेत शिवसेना आणि राष्ट्रवादीही नशीब आजमावत आहेत. याशिवाय पारंपारिक गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या सक्रीय होण्याने होळी आधीच गोव्याच्या निवडणुकांमध्ये रंग भरले आहेत. त्यामुळे गोव्यात कोण सत्ता स्थापन करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
डिचोलीचे अपक्ष उमेदवार भाजपला पाठिंबा देणार
डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा भाजपला पाठिंबा
निकाल जाहीर होताच शेट्ये भाजप सोबत
भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
भाजपने राज्यपालांची मागितली वेळ
भाजप नेते राज्यपालांना भेटणार
राज्यपाल पिल्लई यांच्याकडे भेटीची वेळ मागितली
सरकार स्थापन करण्यासाठी गोव्यात भाजपच्या हालचाली
मगो आमच्यासोबत : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत
गोव्यात भाजप सरकार स्थापन करणार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष आमच्यासोबत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा
सरकार स्थापन करण्यासाठी आज चार वाजता भाजप मुख्यालयात बैठक होणार
प्रमोद सावंत यांची माहिती
साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत ५०० मतांनी विजयी
काँग्रेसचे धर्मेश सगलानी पराभूत
पर्वरी मधून भाजपचे रोहन खवटे विजयी
पणजीतून उत्पल पर्रिकर पराभूत
पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला आहे.
अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पणजीतून पराभव पत्करावा लागला आहे.
भाजपचे बाबुश मोन्सरात हे विजयी झाले आहेत.
उत्पल पर्रिकर यांनी मतमोजणी केंद्र सोडले
गोवा विधानसभा निवडणुकांचा पहिला निकाल हाती
वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे विजयी
विश्वजित राणे हे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव
पर्यें मधून भाजपच्या दिव्या राणे विजयी
मडगाव मधून काँग्रेसचे दिगंबर कामत विजयी
भाजपचे उपमुख्यमंत्री मनोहर(बाबू) आजगावकर पराभूत
मतांमध्ये पिछेहाट होत असल्याचे दिसताच उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मतमोजणी केंद्रावरुन निघून गेले, केपेत आतापर्यंत काँग्रेसचे एल्टॉन डिकॉस्ता आघाडीवर
तिसऱ्या फेरीअखेर हाती आलेला निकाल
वास्को मतदारसंघातून भाजपचे कृष्णा साळकर आघाडीवर
रगाव मतदारसंघातून काँग्रेसचे संकल्प आमोणकर आघाडीवर
र्तोडा मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड चे उमेदवार विजय सरदेसाई 968 मताने आघाडीवर
मडगाव मतदारसंघातून चौथी फेरी अखेर दिगंबर कामत सहा हजार मतांनी आघाडीवर
बाणावली मतदारसंघातून आपचे उमेदवार वेन्झी व्हिएगश आघाडीवर
पे मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अल्टण डिकोस्टा आघाडीवर
कुडचडे मतदार संघातून निलेश काब्राल आघाडीवर
सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर आघाडीवर
काणकोण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रमेश तवडकर आघाडीवर
दक्षिण गोवा सासष्टी विभागाच्या सात मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर
सासष्टी विभागाच्या सात मतदारसंघात काँग्रेस आघाडीवरदक्षिण गोवा सासष्टी विभागाच्या सात मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा पिछाडीवर
मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा पिछाडीवर सांखळी मतदारसंघातून पुन्हा पिछाडीवर गेले असून काँग्रेसचे धर्मेश सगलानी आघाडीवर आहेत.
काँग्रेसचे धर्मेश सगलानी यांची आघाडी
धर्मेश सगलानी यांना 4 हजार 14 इतकी मते, तर मुख्यमंत्री सावंत यांना 3 हजार 697 मते
आतापर्यंत भाजप १७, कॉँग्रेस १३, मगो ५, गोवा फॉरवर्ड व आप प्रत्येकी १, तर अपक्ष दोन जागांवर पुढे
मगोपचे दीपक ढवळीकर आघाडीवर
प्रियोळ मतदारसंघातून महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे दीपक ढवळीकर 100 मतांनी आघाडीवर
प्रमोद सावंत पुन्हा आघाडीवर
साखळी मतदारसंघातून अखेर 140 मतांनी आघाडी
काँग्रेस उमेदवार धनेश सगलानी यांना पिछाडी
नावेलीत आवेर्तान फुर्तादो, नुवेमध्ये आलेक्स सिक्वेरा, वेळ्ळीत सावियो डिसिल्वा आघाडीवर.
पणजी मतदारसंघात अपक्ष उमेदवार उत्पल परिकर पिछाडीवर
भाजपचे बाबूश मोन्सेरात दुसऱ्या फेरीअखेर आघाडीवर
प्रमोद सावंत 400 मतांनी पिछाडीवर
दक्षिण गोव्यातील काणकोण मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे जनार्दन भंडारी पहिल्या फेरी अंती आघाडीवर
मडकईतून मगोचे सुदिन ढवळीकर आघाडिवर, थिवीतून नीलकंठ हळर्णकर आघाडीवर, सांताक्रूझमधून काँग्रेसचे रुडॉल्फ फेर्नांडिस आघाडीवर, मुरगाव काँग्रेस संकल्प आमोणकर 60 मतांनी आघाडीवर, कानकोन मतदारसंघातून काँग्रेसचे जनार्धन भंडारी आघाडीवर
पणजी मतदारसंघात अपक्ष उमेदवार उत्पल परिकर पिछाडीवर
भाजपचे बाबूश मोन्सेरात दुसऱ्या फेरीअखेर आघाडीवर
दक्षिण गोवा दाबोलीम मतदारसंघामधून काँग्रेसचे वेरिटर फर्नांडिस आघाडीवर