ऑनलाईन टीम / पणजी
आज एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत गोवा ‘टीएमसी’ने ‘टीएमसी’ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन फालेरो यांच्या जागी वकील सियोला वास यांना फातोर्डा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून उभे केले असून फालेरोनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. लोकसभा खासदार आणि ‘AITC’चे गोवा प्रभारी महुआ मोईत्रा आणि गोवा ‘टीएमसी’ चे बाणावली उमेदवार चर्चिल आलेमाव यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
आपला निर्णय जाहीर करताना लुइझिन फालेरो म्हणाले, ‘मी याद्वारे फातोर्डा येथून गोवा ‘टीएमसी’चा उमेदवार म्हणून माघार घेत आहे. मी हि जबाबदारी एका तरुण, गतिमान स्त्री सेउला वासकडे सोपवतो. मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्षांचा आभारी आहे. मात्र, माझा अनुभव पाहता राज्य पातळीवर काम करणे, सर्व उमेदवारांच्या यशासाठी गोव्यात प्रचार करणे हे माझे कर्तव्य आहे. मला फातोर्डाच्या एका जागेपुरते मर्यादित ठेवायचे नव्हते म्हणून मी पक्षाला विनंती केली की, एका तरुणीला उमेदवारी द्यावी. आणि मी तुम्हाला खात्री देतो की, ही डेव्हिड आणि गोलियाथ यांच्यातील एक मोठी लढाई असेल. कृतज्ञता व्यक्त करताना सेउला वास म्हणाल्या, “फातोर्डा आणि गोव्यातील सर्व राजकीय अस्थिरतेचे कारण असलेल्या विजय सरदेसाई यांचा सामना करण्यास मी तयार आहे.”
बाणावली मधील गोवा ‘टीएमसी’चे उमेदवार, चर्चिल आलेमाव यांनी गोमंतकीयांना याआधी घडलेल्या मोठ्या फॉर्मेलिन घोटाळ्याची आठवण करून दिली.ते म्हणाले, ‘विजय सरदेसाई हे मौलाना इब्राहिमचे जवळचे सहकारी आहेत, जो फॉर्मेलिनयुक्त मासळी विक्रीच्या अवैध धंद्यात मुख्य आरोपी आहे. लोकांचे जीवन धोक्यात आले, असंख्य गोमंतकीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले,कारण विजय आणि कंपनीने लोकांच्या कल्याणापेक्षा नफा अधिक जवळ केले. त्यांना धडा शिकवण्याची ही तुमची संधी आहे. सेऊला वासला मतदान करून बेकायदेशीर कामांना आळा घाला.’’
हा शेवटच्या क्षणी निर्णय नव्हता, याचा पुनरुच्चार करून महुआ मोईत्रा म्हणाली,‘कोणतीही चूक करू नका, आम्ही फातोर्डामध्ये मोठी लढत देण्यासाठी आलो आहोत. नवीन, विश्वासार्ह उमेदवाराला मत देण्याची ही संधी तुम्ही गमावल्यास, तुमच्याकडे पर्याय नव्हता असे नंतर आम्हाला दोष देऊ नका. कोणत्याही राजकीय कुटुंबाशी संबंधित नसलेल्या एका सुशिक्षित तरुण ,गतिशील महिलेच्या बाजूने आम्ही हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षाच्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे, गोव्याला ताजे, विश्वासार्ह चेहरे प्रदान करणे आणि गतिशील तरुण मोठ्या प्रमाणावर निर्णय प्रक्रियेचा एक भाग आहेत याची खात्री करणे, असल्याचा निर्वाळा मोईत्रा यांनी दिला.