डिचोली/प्रतिनिधी
गोवा डेअरीतील अतिरिक्त दुध कमी दरात फलटण महाराष्ट्र राज्यातील एका दुध कंपनीला पावडर बनविण्यासाठी पाठविले जात असल्याने गोवा डेअरी येणाऱया काळात नुकसानीत येण्याची शक्मयता असल्याने त्याबाबत या डेअरीशी सबंधित असलेल्या आदिनाथ परब व वैभव परब या शेतकऱयांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यासंदर्भात डेअरीकडून उत्तर येण्याऐवजी एका शेतकऱयाला व्यवस्थापकीय संचालकाकडून शिविगाळ करण्याची घटना लज्जास्पद आहे. या घटनेची गंभीर दखल घेत डेअरीच्या व्यवस्थापनाने व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी भारतीय किसान संघ गोवा प्रदेशचे कार्यकर्ते संजिव कुंकळय़?कर यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेला आमठाणे दुध सहकारी संघ सोसायटीचे चेअरमन वैभव परब यांची उपस्थिती होती.
गोवा डेअरी सध्या नुकसानीत आहे. आणि त्यात भर म्हणून सध्या डेअरीतील दुध पावडर करण्यासाठी फलटण महाराष्ट्रात अत्यंत कमी दरात पाठविले जाते. सदर दरांतून डेअरीला कोणताच फायदा होणार नाहीच. शिवाय डेअरी अधिकच नुकसानीत येणार. डेअरी नुकसानीत आल्यास दुध व्यवसायिक आणि शेतकऱयांना त्याचा अधिक फटका बसणार आहे. तसे झाल्यास शेतकऱयांनी कुठे जायचे. या डेअरीशी शेतकरी जुळले आहेत. त्या सर्वां?ची काळजी घेण्याची जबाबदारी डेअरीची असताना डेअरीतील जबाबदार अधिकारी नुकसानीचे व्यवहार करीत आहे, हे गैर आहे. असे संजिव कुंकळय़?कर यांनी सांगितले. सदर प्रकरण प्रकाशात आणल्यानंतर या प्रकरणावर व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी उत्तर देणे गरजेचे होते. मात्र त्यां?नी आदिनाथ परब यांना केलेली शिविगाळ आणि दिलेली धमकी म्हणजे या व्यवहारात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय निर्माण करणारी आहे. त्यासाठी सरकारने आणि डेअरी व्यवस्थापनाने या विरोधात कडक पावले उचलताना अनिल फडते यांना निलंबित करावे. या प्रकरणात आता शेतकरी मागे हटणार नाही. वेळप्रसंगी जर सरकार आणि व्यवस्थापनाने शेतकऱयांचे ऐकले नाही, तर गेटसमोर आंदोलनही करण्यास मागे राहणार नाही. आणि तसे काही घडल्यास त्याला सर्वस्वी सरकार आणि डेअरी व्यवस्थापन जबाबदार राहिल. असा इशाराही यावेळी देण्यात आला.