प्रतिनिधी/ वास्को
गोवा-दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेस ही रेल्वे काल बुधवारपासून पुन्हा वास्कोतून सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वास्कोत कोरोना संसर्ग वाढल्याने जूनच्या पहिल्या आठडवण्यात ही रेल्वे सेवा वास्कोपर्यंत येणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे मडगावातच शेवटचा थांबा घेत होती. तसेच मडगाव रेल्वे स्थानकातूनच दिल्लीकडे जात असे. आता काल बुधवारपासून ही सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आलेली आहे. बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजता ही रेल्वे वास्कोतून दिल्लीकडे रवाना झाली. परतीची रेल्वे दिल्लीहून उद्या शुक्रवारी सकाळी वास्कोत दाखल होईल.