प्रतिनिधी / मडगाव
गोवा दूरदर्शन तर्फे आज सोमवार दि. 11 ते गुरूवार दि. 14 मे पर्यंत संध्याकाळी 6 वाजता ‘झिलबा राणो’ या कोंकणी टेलेसिरीयलचे प्रक्षेपण केले जाणार आहे. शणै गोंयबाब यांनी लिहीलेल्या नाटकावर आधारीत या टेलेसिरीयलचे दिग्दर्शन वैकुंठ पै फोंडेकर यांनी केले आहे.
बोरी येथील पुरातन ‘बोरकर वाडा’ तसेच पेडणे येथिल स्व. जितेंद्र देशप्रभू यांच्या राजवाडय़ात या टेलेसिरीयलच्या मुख्य भागांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या टेलेसिरीयलसाठी विशाल पै काकोडे यांनी संगीत, महेश पै फोंडेकर यांनी कला-दिग्दर्शन व राजू नायक यांनी पटकथा लेखन केले आहे.
टेलेसिरीयलमध्ये महेश पै फोंडेकर, राजू नायक, कुसुम पै पाणंदिकर, विशाल पै काकोडे, महेश नायक, स्व. त्रिवीक्रम आमोणकर, स्मिता पै काकोडे, वैकुंठ पै फोंडेकर, शाम नायक, शिला पै फोंडेकर, लक्षदा नायक, समर्थ धोंड, माजी आमदार दामू नाईक, नारायण पै फोंडेकर, स्व. सतिश प नायक, योगेश घोडे, सचिन महालक्ष्मीकर, संध्या पै फोंडेकर, प्रविणा महालक्ष्मीकर, शेखर पै फोंडेकर, शिल्पा घोडे तसेच बाल कलाकार कौशिक पै फोंडेकर, वैष्णवी पै काकोडे, चैत्रा पै फोंडेकर, सरु नायक, शांतेश पै फोंडेकर, सार्थकी नायक, सची नायक, कौशमी पै फोंडेकर, मृगा नायक यांच्या भूमिका आहेत.