ऑनलाईन टीम / गोवा
गोवा विधानसभा निवडणूक बाबत भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने गोव्यातील सर्व जागा लढणार असलो तरी सद्या ३४ उमेदवारांची नावे जाहीर केली असून येत्या एक ते दोन दिवसात उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
भाजपच्या ३४ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीतून उमेदवारीचे प्रबळ दावेदार इजिदोर फर्नांडिस व दीपक पाऊसकर यांना डावलले गेले आहे. तर इजिदोरच्या जागी रमेश तवडकर यांना तर पाऊस्कर यांच्या जागी गणेश गावकरी यांना दिली संधी दिली गेली आहे. तसेच मोन्सेरात व राणे दाम्पत्याला म्हणजेच दिव्या राणे व विश्वजित राणे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच मिलिंद नाईक व बाबू आजगावकर यांची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.