पणजी/ प्रतिनिधी
गोवा भाजपच्या माजी सैनिक विभागाच्यावतीने आज गुरुवारी अनंत जोशी यांची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रामदास तुकाराम महाले यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कॅ. वामन नाईक, वियान पिआदो अजावेदो, सार्जंट कृष्णा पांडुरंग माजिक, पेटी अधिकारी अनिल विश्राम बोंदे, अशोक असोगेकर, सुभेदार नामदेव नारुलकर, लेफ्टनंट कृष्ण लाल श्रीवास, अग्रणी श्रीराम शर्मा, सुभेदार विलास कृष्णा गावस, मास्टर चीङ्ग पेटी अधिकारी प्रथम वर्ग ए. जी. शेख, अग्रणी शिवप्रसाद सोनकर, पेटी अधिकारी लक्ष्मीकांत नवसो गावकर, पेटी अधिकारी अभय आत्माराम बर्वे, पेटी अधिकारी आर. गणेश कुमार, अग्रणी सुधीर दुबल आणि जगन्नाथ शेटकर यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना माजी सैनिक विभागाची स्थापना झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी बोलताना संयोजक अनंत जोशी म्हणाले की गोव्यात 2800 माजी सैनिकांची कुटुंबे राहतात. गोव्यातील तरुण विविध संरक्षण दलात नोकरीसाठी जावेत म्हणून यापुढे या विभागातर्फे जागृती करण्यात येणार आहे. त्यांना या दलातील नोकऱयांची माहिती नसते आणि जागृती नाही अशी दोन प्रमुख कारणे त्यांनी सांगितली. भविष्यात गोव्यात कसली आपत्ती आली तर हा विभाग मदतीसाठी धावेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. श्री. तानावडे यांच्या हस्ते विभागातील प्रमुख पदाधिकाऱयांचा व सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.