प्रतिनिधी /पणजी
गोमंतक कथालेखकांना उत्तेजन द्यावे, या हेतूने गोवा मराठी अकादमीने कथा स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत गोमंतकीय कथाकारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अकादमीने या स्पर्धेला भरघोस बक्षिसे ठेवली होती. कथा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
या कथा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. 6000 दीपा जयंत मिरिंगकर यांच्या ‘एक वादळ सुरू झाले !!!!’ या कथेला, द्वितीय पारितोषिक रु. 5000 मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर यांच्या ‘चकवा’ या कथेला, तृतीय परितोषिक रु. 4000 महेश तुकाराम पारकर यांच्या ‘उद्योजक घडताना’ या कथेला, चौथे पारितोषिक रु. 3000 अपूर्वा आनंद ग्रामोपाध्ये यांच्या ‘नातीगोती’ या कथेला, पाचवे पारितोषिक रु. 2500 सोनाली सखाराम सावळ देसाई यांच्या ‘भय इतले संपत नाही’ या कथेला, सहावे पारितोषिक रु. 2000 रामनाथ न. पै रायकर यांच्या ‘शोध’ या कथेला तर सातवे पारितोषिक रु. 1500 अपूर्वा उत्कर्ष कर्पे यांच्या ‘एक नवी सुरूवात’ या कथला प्राप्त झाले आहे.
कथा स्पर्धेचे परीक्षण – चंद्रकांत महादेव गावस व बाळ सप्रे यांनी केले. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे गोवा मराठी अकादमीतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.