प्रतिनिधी /मोरजी
गोमंतकीयांच्या हातात असलेला एकमेव व्यवसाय टेक्सी व्यवसाय .आता सरकार हिसकावून घेवून तो बिगर गोमंतकियांच्या हातात देवू पाहत आहे , पर्यटनमंत्री बाबू आजगावकर विधानसभेत छातीठोकून आपण गोवा माईल्स आणल्याचा जाहीरपणे सांगतात आता त्यांनीच व पर्यटन विकास महामंडळ चेरमेन आणि मांदेचे आमदार दयानंद सोपटे यांनी तो एप रद्द करावा अन्यथा दोन्ही आमदाराना घरी बसवण्यासाठी तयारी करायला आम्हाला वेळ लागणार नाही असा इशारा टेक्सी व्यावसायिकांनी मोरजी येथे दिला. स्थानिकांच्या पोटावर पाय ठेवणाऱया लोकप्रतिनिधींचा टेक्सी व्यवसाईकानी यावेळी निषेध केला .
पेडणे व बार्देश टेक्सी व्यावसायिकांनी 30 रोजी खिंड मोरजी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती . यावेळी बाप्पा कोरगावकर ,योगेश गोवेकर , संजय कोले , प्रकाश पुरखे बेबलो सिमायीस ,आदींनी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर व मांदेचे आमदार दयानंद सोपटे यांच्यावर खरमरीत टीका केली .
100 गुन्हे दाखवा ; बाप्पा कोरगावकर
टेक्सी व्यवसाईक संघटनेचे पदाधिकारी बाप्पा कोरगावकर यांनी बोलताना टेक्सी व्यवसाईक प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक काम करतात ,मात्र पर्यटनमंत्री बाबू आजगावकर व्यावसाईकावर आरोप करतात , जर सरकारने व्यावसाईकावर लेखी 100 गुन्हे नोंद केलेले दाखवावेत अन्यथा पर्यटनमंत्री किती प्रामाणिक आणि कसे कमिशन खातात? यांच्या लेखाजोखा जनतेकडे आहे .मांदे आणि पेडणेकरांच्या मतावर ते निवडून आले त्यांना पेडणेकर त्याना परत घरी पाठवायला उशीर करणार नाही असा इशारा दिला .
क्रीडा खात्याचा काय लाभ ?
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे क्रीडा खाते आहे त्यांनी त्या खात्यांतर्गत युवकाना विविध क्रीडा प्रकारचे प्रशिक्षण देवून खेळाडू तयार करायला हवे , पण आजगावकर ते करणार नाही , ते आता शामा प्रसाद स्टेडीयम खाजगीरीत्या लीजवर देणार आहेत ते केवळ कमिशन खाण्यासाठी असा दावा कोरगावकर यांनी केला . हॉटेल लीजवर देतात ते कमिशन खाण्यासाठी , टेक्सी व्यवसाईक चोर नाहीत , आरोप करताना सिद्ध करावे ,केले तर तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकतो तुमच्या घरी पाणी भरतो असे सांगितले. .
आता कृती …
सरकार आणि टेक्सी व्यवसाईकांची आजपर्यंत एकदाही बैठक तोडगा काढण्यासाठी झाली नाही , सरकार फटिंग पणाचा कळस गाठत आहे , आता चर्चा नाही , ही वेळ आहे कृती करण्याची आणि व्यावसाईक आता पेडणेतील दोन्ही आमदाराना कृतीतून शिकवणार असे सांगितले . टेक्सी व्यवसाईक संघटीत होवून दोन्ही आमदाराना घरी पाठवू. आमचे आमदार आणि सरकार निवडून आणू असे सांगितले .
प्रकाश पुर्खे
मोर्जीचे व्यवसाईक प्रकाश पुर्खे यांनी बोलताना पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे विधानसभेत चक्क खोटे बोलून टेक्सी व्यावसाईकांकडे बैठक झाल्याचे सांगतात त्याला प्रति आव्हान देताना त्याला विचारा तेच सांगतात कि गोवा माईल्स हि मागच्या दराने आली ,त्याचेच मंत्री व आमदार म्हणतात मग आमची बैठक त्यांनी कधी घेतली . दीड वर्षे गोवा माईल्स बेकायदा चालली , 2018 गोवा माईल्स विषीई टेंडर घातले तर मग त्यापूर्वी आमची बैठक कधी घेतले ते जाहीर करावे असे आवाहन केले ,त्यांनी समोरासमोर आमच्यासोबत बसावे असे आवाहन केले . या माईल्स एप मध्ये किती बिगरर्गोमतकीय आहेत याची माहिती सरकारला नाही .
भाजपा सरकारचे सहा महिनेच शिल्लक : योगेश गोवेकर
योगेश गोवेकर यांनी सांगितले सरकार हिटलर शाही हुकुमशाही पद्धतीने वागत आहे , आता त्याचे फक्त सहा महिने राहिले , किनारी भागातील भाजपचा एक तरी आमदार निवडून येतो तर ते आम्ही पाहणार आम्हाला अटक करायची तर करू दे , पौर्तुगीज गेले तरी त्यांचे वंशज असलेले हिटलरी भाजपा सरकार आले असे गोवेकर यांनी यावेळी सांगितले
बेब्लो सिमोईस
बेब्लो सिमोयीस यांनी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना आता लोकच धडा शिकवतील . चर्चिल आलेमाव विधानसभेत क्रीडा मंत्री बाबू आजगावकर याना विचारतो कि आपल्याला क्रीडा खात्यातून निधी का दिला नाही , त्यानाही टेक्सी व्य्यावासाईकांचे पडलेले नाही . संजय कोले
संजय कोले यांनी बोलताना मीटर बसवण्याची भाषा सरकार करतो तर मग जी गोव्यात हॉटेल आहेत त्या सर्वाचे खोल्यांचे दर एकाच असतील याची खबरदारी घ्यावी , विमानाची एकाच दर द्या असे आवाहन करून कमिशन खाण्याचे बंद करा अशी मागणी केली .