प्रतिनिधी /पणजी
गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवानिमित्त गोवा मुख्याद्यापक संघटनेने गोव्यातील सरकारी आणि अनुदानीत सर्व शाळांसाठी वर्षभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेण्याचा उचांक स्थापन करणारा हा कार्यक्रम ठरणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक विलास सतरकर यांनी दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष माधव खारवी उपस्थित होते.
गोव्याच्या स्वतंत्र संग्रामावर प्रश्नमंजुशा स्पर्धा घेण्यात येईल ही स्पर्धा तालुका पातळीवर व नंतर राज्य पातळीवर होईल त्यात किमान 1 लाख विद्यार्थी सहभागी होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पाचवी ते सातवी या गटासाठी ऑनलाईन स्पर्धा तर 8 वी ते 10 वीसाठी शाळा शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात येतील गोवा मुक्तीचे फलीत या विषयावर पोस्टर तयार करण्याची स्पर्धा 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी होईल तसेच याच विषयावर 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना निबंध लेखन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. कोकणी, मराठी, हिन्दी व इंग्रजी या भाषा पैकी कुठल्याही भाषेत निबंध पाठवला जाऊ शकतो.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी देश भक्तीपर गीत गायन स्पर्धा होईग्नल. 5 वी ते 10 वीपर्यंतच 12 विद्यार्थी त्यात सहभागी होऊ शकतात अशी माहिती त्यांनी दिली. सर्व मुख्याद्यापकांसाठी परिषद भरवणार असून त्यात गोव्यातील 325 मुख्याद्यापक सहभागी होणार आहे. शिक्षणाची वाटचाल काल आज व उद्या अशा विषयावर चर्चा होणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी व इतर विषयांवर चर्चा होणार आहे. गोवा मुख्याद्यापक संघटनेने वर्षभरासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तालुका पातळीवर समित्या स्थापन झाल्या आहेत तिसवाडीसाठी फा. आग्नेल हायस्कूलचे फा. पिओ फुर्तादो, बार्देशसाठी प्रगती हायस्कूलचे संजय शिरगांवकर व कुचेली म्हपसा येथील डॉ. आंबेडकर हायस्कूलचे चेतन कुबल, पेडणेसाठी मांद्रे हायस्कूलचे विवेक बोडके, डिचोलीसाठी महालक्ष्मी हायस्कूलचे निलेश गुणाजी, सत्तरीसाठी श्रीराम हायस्कूलचे शिवाजी देसाई, सासष्ठीसाठी वेर्णा येथील मारिना हायस्कूलच्या जेसुयना फ्लोरा वालादारीस व सेंटजूड्स हायस्कूल बेताळभाटीच्या सुनंदा कार्दोजो, होली स्पिरीट मडगावच्या एस्मीराल्डा फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगे तालुक्यासाठी अवर लेडी ऑफ फातिमा रिवण चे फा. रिचर्ड क्रास्तो, मुरगांव तालुक्यासाठी मुरगाव हायस्कूलचे तुळशीदास देसाई, केपेसाठी हॉलीक्रॉस, केपेचे रश्मी डिसौझा, फोंडासाठी पाळी येथील श्रीमती ताराबाई हायस्कूलचे रूपेश कामत, धारबांदोडा तालुक्यासाठी दाभाळ इमेक्युलेट हायस्कूलच्या सिस्टर फ्लोरी रॉड्रिगीस यांची नियुक्ती केल्याची माहिती त्यांनी दिली.