प्रतिनिधी / नरंदे
गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ब्रिलियंट स्कुल, नरंदेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विविध गटात १५ देशातील १५००पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कोल्हापुरच्या नरंदे गावातील क्रिश अतिष मलकेकर याने सुवर्ण, तर आर्यन संभाजी शेजाळ व नरेंद्र भगवान सोनवने यांनी रौप्य पदकाची कमाई केली.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक श्री. नितिन पाटील, मुख्याध्यापिका सौ. शुभांगी पाटील, अधिक्षक श्री. प्रविण पाटील, क्रिडा शिक्षक राहुल इंगळे, सुरज पाटील, सहा. शिक्षिका सौ. शैलजा पल्लखे, सौ. रेश्मा शेटे, सौ. अनिता भोईटे, श्री.विक्रांत माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.