दोडामार्ग / वार्ताहर:
बोरी गोवा येथील मनुराय नाईक यांच्या गोवा कराटे व फिटनेस सेंटरतर्फे आयोजित कराटे स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील चार कराटेपटू यशस्वी ठरले. ही स्पर्धा शिरशिरे बोरी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या हॉलमध्ये संपन्न झाली. यात गोवा राज्यातील सुमारे दोनशेहून अधिक कराटेपटू सहभागी झाले होते. यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील इझिकल फर्नांडिस व रिमी राजेश गवस या दोघांनी रौप्यपदक तर जित समीर तुळसकर व तानाजी जाधव या दोघांनी कांस्य पदक पटकावले. या कराटेपटूना मुख्य प्रशिक्षक प्रशांत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिरोडेचे आमदार सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते झाले. स्वामी विवेकानंद विद्यालयाचे संस्थापक व माजी प्राचार्य मीनानाथ उपाध्ये, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुब्रमण्यम, सुनील सावकार, कमलाकांत गावडे, दिगंबर बोरकर, कमलाकांत नाईक, ब्रह्मानंद सावर्डेकर विष्णू नाईक, दत्ता नाईक, गणपुले, दीपक कोरडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. यशस्वी काराटेपटूचे दोडामार्गमधील विविध स्तरातून कौतुक होत असून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.