विधानसभेची मुदत 15 मार्च रोजी संपुष्टात : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू
प्रतिनिधी /पणजी
भारतीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. गोवा विधानसभेची मुदत दि. 15 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत असून तत्पूर्वी गोव्यासह इतर 4 राज्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अधिकाऱयांच्या बदल्या करताना ते रहात असलेल्या वा सध्या काम करीत असलेल्या ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी करा, मग ते ज्या ठिकाणी राहतात त्या जिल्हय़ामध्ये त्यांची बदली करू नये, असे कळविले आहे.
या संदर्भात गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांनाही तसे लेखी कळविले आहे. थोडक्यात निवडणूक आयोगाच्या किंचित प्रमाणात गोव्यात अंमल सुरू झालेला आहे. गोवाची मुदत दि. 15 मार्च 2022 रोजी, मणिपूरची मुदत 19 मार्च रोजी, पंजाबची मुदत 27 मार्च रोजी, उत्तराखंडची मुदत 23 मार्च रोजी व उत्तर प्रदेशची मुदत दि. 14 मे रोजी संपुष्टात येत आहे.
सर्व निवडणुका या मार्चच्या दुसऱया आठवडय़ात संपुष्टात येणार असून गोव्याची निवडणूक ही फेब्रुवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक 6 ते 8 टप्प्यात होईल असे चित्र आहे. मात्र आयोगाने मुख्य सचिवांना व मुख्य निवडणूक अधिकाऱयांना पत्र पाठवून अधिकाऱयांच्या बदल्या करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. गोव्यातही आता लवकरच अनेक अधिकाऱयांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.