प्रतिनिधी / वास्को
गोवा शिपयार्डतर्फे भारतीय नौदलासाठी बांधण्यात येणाऱया दुसऱया अत्याधुनिक मिसाईल फ्रिगेटस् जहाज बांधणीचा शुभारंभ काल शुक्रवारी गोवा शिपयार्डमध्ये करण्यात आला.
नौदल उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल अशोक कुमार यांनी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी बी नागपाल, गोवा शिपयार्डचे संचालक, नौदल आणि गोवा शिपयार्डच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत या जहाजाच्या बांधकामाचा शुभारंभ केला.
प्रमुख पाहुणे नौदल उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल अशोक कुमार यांनी गोवा शिपयार्डने भारतीय उद्योजकांच्या सहकार्याने मोठय़ा प्रमाणात स्वदेशीकरण साधण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. प्रथमच मोठय़ा प्रमाणात स्वदेशी उपकरणांचा वापर करून जहाजे बांधण्यात येत आहेत. जहाजांचे संपूर्ण बांधकाम स्वदेशी स्टीलद्वारे करण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी शिपयार्डच्या कामगिरीची प्रशंसा केली. गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक क्बी बी नागपाल यांनी कोविड 19 च्या कठीण काळातही कर्मचाऱयांच्या सहकार्यामुळे उत्पादन सुरू ठेवणे शक्य झाल्याचे स्पष्ट केले. स्वदेशी जहाज बांधणीव्दारे सागरी सुरक्षा दलाच्या गरजा पूर्ण करयासाठी गोवा शिपयार्ड तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय नौदलासाठी दोन मिसाईल फ्रिगेटस् बांधणीचा करार गोवा शिपयार्डने 25 जानेवारी 2019 रोजी केला होता. त्यानंतर 29 जोनवारी 2021 रोजी पहिल्या मिसाईल फ्रिगेटस् जहाज बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. मिसाईल फ्रिगेटस् बांधणी प्रकल्पातील पहिले जहाज 2026 पर्यंत पूर्ण करून नौदलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. सहा महिन्यानंतर दुसरे जहाजही नौदलाकडे सुपूर्द करण्यात येईल.