प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावरून धावणाऱया गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱया महिलेचे दागिने व 20 हजाराची रोकड असा 1 लाख 16 हजार रूपये किंमतीचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
या बाबत चंदादेवी (रा. उत्तरप्रदेश) यांनी तक्रार नोंदवली आहे. गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेसमधून दिल्ली ते मडगाव प्रवास करत होत्या. येथील स्थानकात त्यांच्या पर्समधील दागिने व 20 हजाराची रोकड अज्ञाताने लंपास केल्याचे निदर्शनास आल्यानंतर धक्का बसला. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत रत्नागिरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याच स्थानकातून कागदपत्रे येथील स्थानकात दाखल होताच अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.