मुलगी होईपर्यंत लपवून ठेवले लग्नाचे रहस्य
‘द कपिल शर्मा’ शोमध्ये आठवणींना उजाळा
अभिनेता गोविंदाने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप पाडली आहे. त्याचा अभिनय जबरदस्त झाला आहे. गोविंदाने जवळपास प्रत्येक शैलीतील चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विशेषतः कॉमिक टायमिंगची त्याला वेगळी जाण आहे. तथापि, चित्रपटांमधील त्याचा ‘कॉमिकपणा’ वैयक्तिक आयुष्य जगत असतानाही दिसून आला. अलीकडेच ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये काही बाबी उघड केल्यानंतर त्याच्या आयुष्यातील काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
बॉलिवूड स्टार गोविंदाने पत्नी सुनीता आहुजासोबतचे लग्न गुपित ठेवले होते. घरात कन्यारत्न (टीना) जन्माला आल्यानंतर गोविंदाने आपल्या आणि सुनीताच्या लग्नाबद्दल लोकांना सांगितले. गोविंदा आणि सुनीताने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता. गोविंदाने त्याच्या आणि सुनीताच्या नात्याबद्दल सांगितले की, जेव्हा त्याने त्याच्या आईची परवानगी घेतली तेव्हा त्याने लग्न केले पण त्यावेळी त्याने तिला सर्वांसमोर आणले नाही. कोणी आपले करिअर हिरावून घेईल याची भीती त्याला वाटत होती. ‘त्यावेळी माझे करिअर माझ्या बाहुलीसारखे असायचे. माझी बाहुली कोणीतरी हिसकावून घेईल, अशी भीती मला वाटत होती.’ असे सांगत गोविंदाने ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये धमाल उडवून दिली. सुनीतानेही या मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिचे गोविंदावर खूप प्रेम आहे. ती खूप भाग्यवान आहे की तिला गोविंदासारखा नवरा मिळाला आहे. सुनीताचे हे शब्द ऐकून गोविंदाही भावूक झाला.