महाराष्ट्राज बेस्ट डान्सर हा कार्यक्रम थोडय़ाच काळात प्रेक्षकांचा आवडता झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयांतून आलेली नफत्यातली प्रतिभा प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळतीय.
नुकतेच महाराष्ट्राज बेस्ट डान्सरमध्ये हिरो नंबर वन गोविंदा उपस्थित राहिले.. गोविंदाच्या येण्यानी स्पर्धक आणि गुरू यांच्यातला उत्साह वाढला आहे. या आठवडय़ात होणारी सगळी सादरीकरणं गोविंदाला समर्पित केली. गोविंदासाठी खास ट्रिब्यूटही सर्व स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी सादर केलेले पाहायला मिळाले. गोविंदाच्या गाण्यांवर आणि गोविंदाच्या स्टेप्स वापरून केलेली नफत्यं पाहून गोविंदाही भारावून गेला. एवढंच नाही तर मंचावर येऊन त्यानी स्पर्धकांबरोबर नफत्यही केलं.
गोविंदाच्या आयकॉनिक स्टेप्स नफत्याच्या महामंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. धर्मेश सर स्वत: गोविंदाचे चाहते असल्यानी गोविंदाच्या उपस्थितीनं तेही भारावून गेले होते. स्पर्धकांमधील आर्य डोंगरे याच्या आजोबांनी जमवलेल्या गोविंदाच्या आईच्या आवाजातली दुर्मीळ चित्रफीतही महाराष्ट्राज बेस्ट डान्सर टीमकडून भेट म्हणून देण्यात आली.