क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोव्याने पाचव्या राष्ट्रीय मिनी 14 वर्षांखालील टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत आकर्षक डबल साधताना मुलांच्या आणि मुलींच्या विभागातील जेतेपदे मिळविली. या स्पर्धेचे आयोजन तामिळनाडूच्या नमाक्कल येथील भारत पॉलिटेक्निक इन्स्टिय़ूटच्या मैदानावर झाले. गोव्याच्या मुलांनी अंतिम लढतीत महाराष्ट्रचा तर मुलींनी जेतेपद मिळविताना तामिळनाडूचा पराभव केला. गोव्याच्या या जेतेपदाने स्पर्धेत सलग पाचव्यावेळी दोन्ही संघानी राष्ट्रीय जेतेपदे मिळविली आहेत.
मुलांचा विभागः उपान्त्यपूर्व सामना- गोवा, 6 षटकात 3 बाद 74 (सुबोध नाईक 23, साहिल पारोडकर 21 धावा) विजयी विरूद्ध केरळ, 6 षटकात 3 बाद 34 (विराज तारी, दीप शेटय़े व नेहाल खेडेकर प्रत्येकी एक बळी). गोवा 39 धावानी विजयी.
उपान्त्य सामनाः गोवा, 6 षटकात 3 बाद 72 (साहिल पारोडकर 27, सुबोध नाईक 19 धावा) विजयी विरूद्ध पुडिचेरी, 8 षटकात 9 बाद 45 (विराज तारी, दीप शेटय़े, चिन्मय केतकर व सुबोध नाईक प्रत्येकी एक बळी). गोवा 27 धावानी विजयी.
अंतिम सामनाः गोवा, 8 षटकात 5 बाद 85 (साहिल पारोडकर नाबाद 41, वरद लिंगुडकर 11 धावा) विजयी विरूद्ध महाराष्ट्र, 8 षटकात 6 बाद 46 (दीप शेटय़े 2-8, राज शेटय़े 2-2, साहिल पारोडकर 1-6). गोवा 39 धावानी विजयी.
महिला विभाग, उपान्त्य सामनाः गोवा, 6 षटकात 1 बाद 114 (रिया मालवणकर नाबाद 45, आर्या परब 28, सर्वस्वी गावकर 15 धावा) विजयी विरूद्ध राजस्थान, 6 षटकात 3 बाद 33 (रिया मालवणकर 2-7). गोवा 81 धावानी विजयी. अंतिम सामनाः तामिळनाडू, 6 षटकात 1 बाद 40 (रिया मालवणकर 1-7) पराभूत विरूद्ध गोवा, 3.2 षटकात 1 बाद 41 (रिया मालवणकर 17, आर्या परब नाबाद 10, तनिशा नाईक 9 धावा). गोवा 7 विकेट्सनी विजयी).